Kalidas Kala Kalamahotsav 2023

भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था संचलित जे. के अकडेमी ऑफ आर्ट अँड डिझाईन, वडाळा येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या MFA व BFA या कला शाखेतील विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन करणाऱ्या कालिदास कला महोत्सव 2023 चे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी, शुभांगी भुजबळ, कला दिग्दर्शक श्री रवींद्र बुगडे आणि डॉ. गणेश तरतरे यांच्या हस्ते दिनांक ९ मार्च रोजी महाविद्यालयाच्या भव्य स्टुडिओ मध्ये करण्यात आले.
या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी सजगपणे जगाकडे पाहण्याची निकड आणि त्यासाठी दर्जेदार साहित्याचे वाचन ,तसेच चित्रपट पाहणे गरजेचे असल्याचे मत पाहुण्यांनी व्यक्त केले.
या प्रदर्शनात मांडलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम कलाकृतींना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
हे प्रदर्शन आयोजित करण्यामागे संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री जे.के. जाधव, प्राचार्य श्री सुरेंद्र जगताप, प्राध्यापक श्री गणपत भडके, सौ पूजा तिखे, श्री सिद्धांत कोंडे आणि श्री विक्रांत सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच जगताप मॅडम, सिद्धी सावंत, बाळा निर्मळ,सुनील वाघ यांचे सुद्धा या कार्यक्रमांत सहकार्य लाभले.
हे प्रदर्शन दिनांक ९ ते१२ मार्च पर्यंत खुले असून कला प्रेमींनी त्याचा आस्वाद घ्यावा, अशी विनंती संयोजकांनी केली आहे.

Ashadhi Ekadashi Panel Design

On behalf of Principal and Staff of J.k.Academy of Art and Design, I would like to Thank u all BFA Students for their awesome contribution for आषाढी एकादशी panel design , you all are really worked hard and made us proud with this achievement, you all had done great team work. We wish you to grow more and get success in future. Keep it up.

Kala Utsav - Freedom of Expression.

Journey of Indian Art – National Seminar & Art workshop by Renowned Indian Contemporary Artists.

The Florence Academy of Art, Italy.

Our Student – Aakash Khetavat, got selected as 2nd finalist in Summer Scholarship Contest help by The Florence Academy of Art, Italy.

आता चिंतन करु (workshop)

An interactive creative career guidance workshop with Mr. Vivek Padwal

६१ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन

जे के अकादमी ऑफ आर्ट अँड डिझाईन वडाळा मुंबई या कला महाविद्यालयातील, आकाश खेटावत आणि ओंकार रहाटे यांना, ६१व्या राज्य कला प्रदर्शनात (विद्यार्थी विभाग) विशेष गुणवत्ता राज्य पुरस्कार प्राप्त झाला. त्या बद्दल संस्था अध्याक्ष, प्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

1st All India Women's National Exhibition of Art - 2022
VARNIKA - Samakalina Mahila Kalavidara Samasthe (R) Kalaburagi

वर्णिका समाकालीन महिला कलाविधारा संस्था कर्नाटक कलाबुर्गी यांच्या द्वारा आयोजित केलेल्या पहिल्या ऑल इंडिया वुमन्स नॅशनल एक्झिबिशन ऑफ आर्ट 2022 मधील कॉम्पिटिशन मध्ये आपल्या जे. के अकॅडमी ऑफ आर्ट अन्ड डिझाईन मधील बी. एफ. ए. प्रथम वर्षाच्या च्या विद्यार्थ्यांनीपारितोषिक पटकावले. बेस्ट फोटोग्राफी चे पारितोषिक ऋतुजा जंगम व बेस्ट फोटोग्राफी उत्तेजनार्थ बक्षीस संहिता पाठारे हिस मिळाले. या कॉम्पिटिशन मध्ये आठ विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला प्रदर्शनामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या लाडक्या प्रिन्सिपल सरांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन🙏

Kavikulaguru Kalidas University's
inception for BFA & MFA

G .D. Art painting -
Teacher demonstration